सारथी - एक लकी चार्म
( आयुष्यातील एकमेव दिशा )
नमस्कार
(टिप- हि एक प्रेरणादायक काल्पनिक कथा असून ह्याचा कोणाच्याही आयुष्यासोबत कोणताही संबंध नाही. असे काही आढळून आल्यास तो योगायोग समजावा.)
( युवराज - एक काल्पनिक पात्र
संयुक्ता- एक काल्पनिक पात्र )
भाग- 01
आयुष्यामध्ये आपल्याला योग्य दिशा दाखवणारं कोणीतरी असलं पाहिजे. खास करून आयुष्याच्या वळणावर. तसेच संयुक्ताही युवराजसाठी केवळ एक लकी चार्म नसून सारथी आहे.मात्र
दि. ७ ऑगस्ट २०२२, आज युवराजची परिक्षा.
आज परिक्षेकरिता तो संयुक्ताच्या शहरात जाणार होता. युवराज आणि संयुक्ता हे दोघे एक अनोखे/हटके मित्र.
परिक्षा केंद्रावर पोहचताच युवराजने संयुक्ता ला भेटण्यासाठी मेसेजेस केले. पण त्याच्या एकाही मेसेजेसला सकारात्मक प्रत्युत्तर आलं नाही. कदाचित संयुक्ताच्या मते त्याला पेपरच्या आधी मेसेजेसला प्रतिसाद दिल्यास तो पेपरच्या वेळेस गोंधळून जाईल, म्हणून तिने रिप्लाय दिला नसावा.
अखेरीस परिक्षा समाप्त झाली. बाहेर जोरदार पाऊस चालू होता. माहीत नाही नियतीच्या मनात काय असावं. युवराज मोबाईल पाहताच त्याला आश्चर्याचा धक्का बसला. संयुक्ताने त्याला भेटायला बोलावले होते. युवराजने त्याच्या तोईकडून छत्री घेऊन संयुक्ताला भेटायला निघाला.
अखेरीस आज तब्बल जवळपास दिड वर्षांनी संयुक्ताला पाहणार होता. पावसाचा कहर वाढतच चालला होता, तसंच मनातही खूप काही वादळे येत होती. मनाला हुरहुर लागलेली. तीला भेटण्याचं कुतुहल तर होतचं, त्याचबरोबर एक नवीन आशा निर्माण होत होती.
भर पावसात युवराज तीला भेटण्यासाठी मार्ग काढत रस्ता शोधत होतो. काही अंतरानंतर युवराज रिक्षाने तिने सांगितल्या पत्यावर पोहचला. तीही भर पावसात युवराजची वाट पाहत होती. त्याला पाहताच ती म्हणाली "छत्री घेऊन आलास, मी तुझ्यासाठी पावसात भिजत थांबले आणि तु मात्र निवांत आला." खरंतर तिचं भाष्य ऐकून तिच्याबद्दलचं प्रेम वाढतच होतं. कोणी कोणासाठी थांबत नसतं, पण आज ती युवराजची वाट पाहत होती. आनंद वाटला, भावूक झाला पण सावरलं स्वतःला.
युवराजने तिला विचारलं काही घेणार का? तिला जे आवडेल ते घे म्हणाला. ती एका कॅफेत घेवून गेली. तिनं खूप सारे तरूण मुलं बसलेली होती. युवराजच्या मनात शंका आली की हे संयुक्ताचे मित्र तर नसावेत, मला धमकावतील की काय? आपल्याला काही ठेच तर पोहोचवणार नाहीत ना? असे अनेक मुर्ख प्रश्नांचा कल्लोळात तो गुंतलेलो. पण तसं काहीच नव्हतं. तिथे खूप सिगारेटचा धूर असल्याने श्वास घेण्यास त्रास होत होता म्हणून दोघेही दुसर्या कॅफेमध्ये गेलो. तिला सांगितलं तुला जे हवं आहे ते घे. तिनं दोन मंचुरीयन ऑर्डर केल्या पण एकच मंचुरीयन होती. त्यामुळे युवराजने व्हेज सँडविच घेतला. त्यांची ऑर्डर येण्यासाठी खूप वेळ लागला. ते थोडंफार बोलत होते पण काही बोलावं ते कळत नव्हतं. तिनं डाॅ. बद्दलपण सांगितलं. हे डाॅ. म्हणजेच संयुक्ताचा प्रियकर. पण, कदाचित हे सर्व काल्पनिक असावं. मंचुरीयन आली, आणि तिनं युवराजलाही टेस्ट करायला लावली. असं युवराजच्या आयुष्यात पहिल्यांदाच घडत होतं की कोणा मुलीच्या प्लेटमधून टेस्ट करत होता. युवराजनेही सँडविच घ्यायला सांगितला. काही वेळाने तिनं युवराजसाठी ओली भेळ ऑर्डर केलेली आली. तो त्या काटेरी चमच्याने भेळ खाण्याचा प्रयत्न करत होता पण, खाता येत नव्हतं. तिनं तिचा चमचा घ्यायला सांगितला पण त्याने नकार दिला, माहीत नाही का? आयुष्यात हे असं पहिल्यांदाच घडत होतं. सर्व काही नवीन होतं. मनाची घालमेल होत असावी. थोडाफार नाष्टा झाला आणि युवराजनेही तिला योजनांबद्दलचा, भविष्याबद्दल सांगितलं.
संयुक्ता म्हणाली माझं बील मी देती पण युवराजने नाही देवू दिलं.
ते कॅफेतून बाहेर आले. ती होस्टेलवर राहत होती. होस्टेल सात वाजता बंद होतं पण, ती सांगून आलेली की मी कॉलेजमध्ये जात आहे. असं कोणीतरी कोणासाठी खोटं बोलतं का? युवराजला तिचा वाढदिवस साजरा करायचा होता पण केक बरोबर नसल्याने ती म्हणाली आईस्क्रीम खाऊ. त्यानी दोन चॉकलेट आईस्क्रीम घेतली. कदाचित ते दोघेही वेडे असावेत. बाहेर पाऊस चालू होता, हवेत गारवा जाणवत होता पण ते मात्र त्या गुलाबी थंडीचा आस्वाद घेत आईस्क्रीम कोन खात होतो. चालत चालत ते तिच्या होस्टेल जवळ आलो. ती म्हणाली रस्ता सापडेल ना? नाहितर हरवशील. खरं आहे संयुक्ता तु नसताना युवराज रस्ता हरवतो पण, तु असल्यास त्यला कशाचीच भिती वाटत नाही. तो तिला म्हणालो एक फोटो काढू पण बॅकग्राऊंड बरोबर नव्हतं, ती म्हणाली मी एडिट करते.
अखेरीस तिला सोडून युवराज माघारी निघाला.
रिक्षात बसल्यावर सर्व काही आठवत होतं. तिचं ते पावसात पाहणं, डोळे वर करत छत्री धरायला लावणं. जणू वेड सिनेमामधील काही क्षण खर्या आयुष्यात घडत होते. तिचा तो एका छत्रीखालचा काही क्षणांचा सहवास. तिचा कॅफेमध्ये हळूवार झालेला स्पर्श. तिचं ते चिडणं, ओरडणं, रागावणं आणि नाजूक स्मितहास्य. तिचे ते काळेभोर दाट केस आणि सरळ साधं राहणीमान. तिच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आणि पावसाचे थेंब. असं वाटायचं की वेळ निघून न जावी. माहीत नाही का पण युवराजला आज त्रासदायक जिवणात पहिल्यांदा खूप वर्षांतून आनंद वाटत होता. युवराजचे सर्व प्रश्न, गैरसमज यांचं एकमेव उत्तर म्हणजेच अर्थात"संयुक्ता" होती.
काही मिनिटांनी युवराजने तिला घड्याळाचे फोटो पाठवले आणि तिला बेस्ट निवडायला सांगितलं. खरं तर त्याला दोन घड्याळं घ्यायची होती एक म्हणजे ताईला आणि दुसरं संयुक्ताला. संयुक्ता नको म्हणाली. तिच्यासोबतचा प्रत्येक क्षण विसावा देत होता. आजचं त्यांचं भेटणं जणू काही 'दिलवाले' सिनेमामधील शाहरुख आणि काजोलसारखं होतं. युवराज कदाचित शाहरुख नसावा पण ती मात्र काजोल होती.
अखेरीस दिवस संपण्यास आला. युवराजला अजून एकदा संयुक्ताला भेटावयास वाटत होतं. त्याने तिला मेसेज केला. ती म्हणाली तिचं कॉलेज सकाळी ७ वाजता असतं. तिच्या म्हणण्याचा अर्थ सकाळी ७ वाजायच्या आत ये असा असावा. अशाप्रकारे संयुक्ताच्या विचारात दिवस कसा निघून गेला समजलेच नाही.
No comments:
Post a Comment