Wednesday, 19 July 2023

मैत्रीचे धागे

मैत्रीचे धागे
( अविस्मरणीय आठवणींचा खजिना )
Part 1 

बाहेर धो-धो पावसाच्या सरी हळूवारपणे कोसळत होत्या, त्याचप्रकारे मनातल्या आठवणींना ओसांडून वाहण्यास निमित्त सापडलेलं असावं. चला तर, आठवणींना थोडा उजाळा देवून पाहूयात. 


( काल्पनिक पात्र- योगेश, देवयानी, राधिका ) 

सदर लेख, कथा, कहानी ही काल्पनिक असून ह्याचा कोणत्याही व्यक्तीशी संबंध नाही. असे काही आढळून आल्यास फक्त तो योगायोग समजावा. 

खूप वर्षांपूर्वी एका गावातून ही काल्पनिक कहानी चालू होती.
योगेश आणि राधिका हे एकाच परिवारात जन्माला आलेले. लहानपणापासून अंगणवाडी, बालवाडी ते चौथी पर्यंत ते एकाच शाळेत शिकतात. त्यात त्यांच्या बर्याच असंख्य आठवणी आहेत. जशा की योगेशची गेल्या 14 वर्षांतली शेवटची रंगपंचमी, ते रंग आणि राधिका. वर्गामध्ये केलेले नूतन वर्षाभिनंदन, अभीष्टचिंतनादिवशी 3/4 वेळा दिलेले चॉकलेट्स, कधीकाळी सोबत खाल्लेला डबा. मधल्या सुट्टीत खेळलेला लपंडाव, लगोरी. प्रजासत्ताकदिनी, स्वातंत्र्यदिनी केलेली भाषणे. दोघेही लहानपणीचे खास मित्रमैत्रिणी होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत कधीकाळी घालवलेले वेळ. असे असंख्य आठवणी आहेत. 


योगेश चौथीनंतर पुढच्या शिक्षणासाठी बाहेर शिकायला गेला. खूप वर्ष निघून गेली. पण, राहील्या मात्र आठवणी. कधी गावी आल्यावर राधिकास पाहून मिळलेला आनंद. खिडकीतून पाहिलेले अविस्मरणीय क्षण. कधीकाळी घरी जाऊन भेटण्याचा आनंद आणि बरच काही. तस पाहायला गेलतर त्या दोघांत जास्त काही संभाषण होत नसायच. 

असंख्य ब्रम्हांड, 8 ग्रह, 1 पृथ्वी, 193 देश, 8 अरब लोकसंख्या तरीही आपण एका व्यक्तीला बोलण्यासाठी धडपड करतो ती असते नि:स्वार्थ मैत्री. 


आज मात्र तब्बल 11 वर्षांनी योगेश राधिकाला शुभेच्छा देण्यासाठीच मेसेज करणार होता. योगेशने राधिकाला ह्या आगोदर सोशल मेडियावरती शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण नियतीच्या मनात काही नविनच असावं. तिकडे राधिकाने मात्र कधीच प्रयत्न केला नाही शोधण्याचा कारण तिचं असं म्हणणं होतं की योगेश खूप व्यस्त असेल आपण का त्याला त्रास द्यावा. पण, राधिकाला थोडीच समजणार होती की आपल्या माणसांचा कधीच त्रास होत नसतो. होतं ते फक्त प्रेम, स्नेह. पण असो एकतर्फी मैत्री हीपण मैत्री असतेच. खरंतर एकतर्फी प्रेमात आणि मैत्रीत कोणतीच अट नसते. असतं ते फक्त नि:स्वार्थी मित्रप्रेम. 

आयुष्याच्या वळणावरती प्रतेकाच्या आयुष्यात एकतरी मित्र-मैत्रिण असावी, जिच्याशी आपण सर्वकाही बोलू, सांगू, भांडावं आणि मनसोक्त हसावं. बाही प्रत्येकाचं आयुष्य ते तर चालतच ना? जसा श्वास कधी थांबत नसतं, ह्रदय त्यांचं काम विसरत नाही. आठवणी आयुष्यात रंग भरून आयुष्यास रंगीबेरंगी बनवतात. योगेश आणि राधिकाही एका आयुष्याच्या वळणावर भेटणार होते. दोघांनीही कधी विचार केला नसेल की आपल्या आयुष्यातून गमावलेला मित्र-मैत्रिण पुन्हा भेटेल. पण म्हणतात ना प्रत्येक शेवट ही नवीन सुरूवात असती. (Every ending is a new beginning) आपला मात्र विश्वास असायला हवा. 


आता तुम्ही विचाराल ही देवयानी कोण? आणि खरच राधिका आणि योगेशची भेट झाली? सर्व प्रश्नांची उत्तरे लवकरच पुढच्या भागात भेटतील. 
धन्यवाद...
To be continued in next episode.

No comments:

Post a Comment

The Ultimate Guide to Viral Content: How to Achieve 10 Million Views

The Ultimate Guide to Viral Content: How to Achieve 10 Million Views Introduction In today’s digital age, crafting a blog that resonates wit...

Popular Blogs