माणुसकी आणि हिंसक व्यथा
आज अनेक मुस्लीम बांधव शिवजयंती अभिमानाने साजरे करतात. छाती ठोकून मी शिवाजी महाराजांचा मावळा सांगतात. हे तुला आज कस काय दिसलं नाही.
एकाची शिक्षा अनेकांना का?
तू हिंदू आहेस, मराठा आहेस, महाराजांचा मावळा आहेस हे उर फुटेपर्यंत अभिमानाने सांगताना आपल्याच शेजारी राहणाऱ्या मुस्लिम बांधवांना आज पळून पळून मारत होतास. तो मुस्लिम म्हातारा होता? गरीब होता की घाबरलेला होता हे ही तुला बघायला जमलं नाही. याचा अर्थ तुला महाराज समजलेच नाहीत. महाराजांना वाचायची आधी तुला गरज आहे.
आपणच सर्व धर्म समभाव शिकलो आणि शिकवतोही. शाहू महाराजांच्या नगरीत राहण्याचा अधिकार आज मग तुला नाही बाळ.
एकाची चूक झाली मान्य आहे. त्याचा शोध घ्या तात्विक गोष्टी जाणून घ्या त्याला खुशाल शिक्षा करा आणि* *केलीच पाहिजे. एकाच खाऊन, दुसऱ्याचं गाणार असेल तर त्याला शिक्षा व्हायलाच हवी.
पण एक चुकला म्हणून सगळ्यांनाच धारेवर धरणे मला योग्य वाटत नाही. कितीतरी मुस्लिम बांधव आज ईद पेक्षा गणेशोत्सव, शिवजयंती आनंदाने साजरी करतात. हे कसे काय विसरला.
जोरजोरात दंगे आणि घोषणा दिल्यावर समोरचा घाबरत आहे असं जर तुला वाटत असेल तर ती तुझी खुप मोठी चूक आहे. त्याने वाद मिटणार नाही तर पेटणार हे वेळेत समजून घे नाहीतर तर परिस्थीती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही.
लेखिका-अर्पणा माने
कृपया जास्तीत जास्त पाठवा
No comments:
Post a Comment